‘डिजिटल पेमेंट्स उत्सवाचा’ आज अश्विनी वैष्णव करणार आरंभ

Digital Bharat

Ashwini Vaishnav will inaugurate the ‘Digital Payments Festival’ tomorrow

‘डिजिटल पेमेंट्स उत्सवाचा’ उद्या अश्विनी वैष्णव करणार आरंभ

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘डिजिटल पेमेंट्स उत्सवाचा’ उद्या अश्विनी वैष्णव करणार आरंभ

डिजिटल पेमेंट्सचे यश , जी 20 सह-ब्रँडेड क्युआर कोड आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, डिजिटल पेमेंट संदेश यात्रा आणि डिजीधन पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि रेल्वे मंत्री, अश्विनी वैष्णव उद्या नवी दिल्लीत ‘डिजिटल पेमेंट उत्सव’ आणि व्यापक मोहीम योजनेचा आरंभ करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हे या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी असतील.Digital Bharat

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय,सर्व नागरिकांना अधिकाधिक सुलभ आणि सोयीस्कर डिजिटल पेमेंट उपाय वाढवण्याचा प्रयत्न करत असून विशेषत: छोटे व्यापारी आणि पदपथावरील विक्रेत्यांसह दुर्गम भाग आणि या भागातील लोकसंख्येचा यात समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

यानुसार देशभरात डिजिटल पेमेंट्सच्या प्रचारासाठी, जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठका होत असलेल्या लखनौ, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू. या शहरांवर विशेष लक्ष केंद्रित करून, सर्व हितसंबंधितांच्या समन्वयाने 9 फेब्रुवारी ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत “डिजिटल पेमेंट उत्सव” ही व्यापक मोहीम आखण्यात आली आहे.

या कार्यक्रमात, जी 20 सह-ब्रँडेड क्युआर कोडचे प्रकाशन, डिजिटल पेमेंट्स आणि डिजिटल समावेशनामध्ये भारताच्या जागतिक नेतृत्वाचा प्रवास दाखवणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन,डिजिटल पेमेंट सुलभ आणि वापरण्यास सोपे करणाऱ्या विविध बँकांच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचा आरंभ, विविध डिजिटल पेमेंट उपायांबद्दल नागरिकांना जागरूक करणे आणि डिजिटल पेमेंटच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेबद्दल त्यांना जागरूक करणे या उद्देशाने आयोजित डिजिटल पेमेंट संदेश यात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणे आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रात अव्वल कामगिरी करणाऱ्या बँकांसाठी डिजिधन पुरस्कारांचे वितरण याचा समावेश आहे.

डिजिटल पेमेंट उत्सव ही इतर केंद्रीय मंत्रालयांच्या सक्रिय सहभागासह खऱ्या अर्थाने.‘संपूर्ण सरकारी उपक्रम’ म्हणून डिजिटल पेमेंट करण्याची संधीही असेल.

भारताचे डिजिटली सक्षम समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत परिवर्तन करणे तसेच तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्यासाठी करण्यासाठी कार्य करणे हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा व्यापक उद्देश आहे.

उत्कृष्ट कामगिरीसाठी बँकर्स आणि फिनटेक कंपन्यांना विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *