Direct flights between Pune and Bangkok
पुणे आणि बँकॉक दरम्यान थेट विमानसेवा
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरार्दित्य सिंदिया यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे: केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरार्दित्य एम. सिंदिया यांनी काल पुणे ते बँकॉक या थेट विमान सेवेचे उद्घाटन केले.
12 नोव्हेंबर 2022 म्हणजे पासून पुणे-बँकॉक-पुणे दरम्यान विमान सेवा सुरु झाली आहे. या मार्गावर दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी विमान उड्डाणे होतील.
पुणे आणि बँकॉक दरम्यानच्या या हवाई संपर्कामुळे व्यापार, शिक्षण आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारत आणि थायलंड या देशांमधील द्विपक्षीय देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळेल, असे ज्योतिरार्दित्य सिंदिया यांनी आपल्या भाषणात सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पुणे विमानतळ हे देशातील महत्त्वाचे विमानतळ असून या विमानतळावर पायाभूत सुविधा उभारण्याला सरकार चालना देत आहे. या विमानतळाचे नवीन टर्मिनल पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, तर नवीन आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनल (मालवाहतूक केंद्र) डिसेंबर 2024 पर्यंत विकसित होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत वापरासाठी एक एकीकृत एअर कार्गो टर्मिनल मार्च 2023 पर्यंत विकसित केले जाईल, अशी माहितीही सिंदिया यांनी यावेळी दिली. इथे बहु-स्तरीय वाहनतळ आधीच बांधून तयार असून ते लवकरच कार्यान्वित होतील असेही ते म्हणाले.
स्पाईसजेट कंपनीचे SG-81 हे विमान पुण्याहून संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण करेल आणि थायलंडच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे 12 वाजून 40 वाजता बँकॉक विमानतळावर उतरेल. तर SG-82 हे विमान बँकॉकहून थायलंडच्या प्रमाणवेळे नुसार दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी उड्डाण करून, पुण्यात संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. या मार्गावर बोईंग 737 विमान उड्डाणे करणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पुणे आणि बँकॉक दरम्यान थेट विमानसेवा”