Discussion between Sharad Pawar and Nana Patole on misuse of central machinery and load shedding
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि भारनियमनावर शरद पवार आणि नाना पटोले यांची चर्चा
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर केलेल्या कारवाया, कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यावर ओढवलेले वीजेचे संकट, केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक पुरेसा न केलेला कोळसा पुरवठा या आणि इतर विषयावर आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार चर्चा केली.
या सर्व विषयांवर दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करतील, असंही त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारची ही मनमानी जास्त दिवस चालणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणामार्फत जेंव्हा मविआ नेत्यांवर कारवाई केली जाते तेव्हा ‘कर नाही तर डर कशाला?’ असे म्हणणारे भाजपा नेते प्रविण दरेकर आणि इतर भाजपा नेते राज्यातील यंत्रणा कारवाई करतात तेव्हा आकांडतांडव का करतात?’ असंही त्यांनी या चर्चेनंतर वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं.
Hadapsar News Bureau.