प्रधानमंत्री आणि शरद पवार यांच्यात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यासह विविध विषयांवर चर्चा

Discussions between the Prime Minister and Sharad Pawar on various issues including the issue of 12 MLAs appointed by the Governor

प्रधानमंत्री आणि शरद पवार यांच्यात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यासह विविध विषयांवर चर्चा

नवी दिल्ली : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. यावर प्रधानमंत्री निर्णय घेतील,असं शरद पवार यांनी या

Nationalist Congress Party President Sharad Pawar हडपसर मराठी बातम्या , Hadapsar News, Hadapsar Latest News
File Photo

बैठकीनंतर नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. संजय राऊत यांच्या निकटवर्तींयांच्या मालमत्ता जप्तीच्या मुद्द्यावरही प्रधानमंत्र्यांशी चर्चा झाली.

अशा कारवाईची गरज होती का असा सवाल पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना उपस्थित केला. मात्र नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईसंदर्भात काहीही चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.

 केंद्रीय यंत्रणा करत असलेल्या कारवाईमुळं सरकारला कसलाही धोका नसून महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल असा दावाही त्यांनी केला. सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही, असंही ते म्हणाले.

दुसऱ्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी कॉग्रेस कधीच भाजपाबरोबर जाणार नाही. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना भाजपाविरोधात उभे आहोत आणि राष्ट्रवादी कॉग्रेस कधीच भाजपासोबत नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Hadapsar News Bureau.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *