शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत २९ नोव्हेंबरला सुनावणी

Uddhav Thackeray Eknath Shinde उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Hearing on November 29 regarding the dispute between the two factions of Shiv Sena

शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत २९ नोव्हेंबरला सुनावणी

Uddhav Thackeray Eknath Shinde उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

मुंबई : राज्यातल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं सुनावणी पुढे ढकलली असून, आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठानं, दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरुपात बाजू मांडायला सांगितलं आहे.

दोन्ही बाजूंनी कोणते मु्द्दे मांडले जातील आणि कोणते वकील बाजू मांडतील, याची माहितीही द्यावी, असं देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. १६ आमदारांची अपात्रता यासह इतर याचिका घटनापीठासमोर आहेत.

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणासाठी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश आहे.

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात याप्रकरणाची सुनावणी झाली होती. नंतरच्या काळात अनेक सुट्ट्या असल्याने ही सुनावणी १ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

त्यामुळे जवळपास एक ते सव्वा महिन्याच्या खंडानंतर सत्तासंघर्षाच्या प्रकरणाबाबत सुनावणी झाली. मात्र, आता याप्रकरणाची सुनावणी आणखी चार आठवड्यांनी लांबणीवर पडली आहे.

यापूर्वीच्या सुनावणीत घटनापीठाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवून ठाकरे गटाला एकप्रकारे धक्का दिला होता.

घटनापीठाने मुभा दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवले होते. त्यामुळे शिवसेनेला मशाल हे नवे चिन्ह घ्यावे लागले होते. अनेक वर्षांपासूनची ओळख पुसली गेल्याने आता शिवसेनेसमोर (ठाकरे गट) नव्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान असेल.
.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *