सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीवर नोटीस जारी

Narhari Zirwal, state Deputy Speaker in the Assembly विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Notice issued by the Deputy Speaker on disqualification of 16 MLAs

सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीवर विधानसभा उपाध्यक्षांची नोटीस जारी

मुंबई : शिवसेनेतील 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. यासंदर्भात शिवसेनेने विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना काल याबाबतचे पत्र दिले होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या १६ बंडखोर आमदारांवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज नोटीस बजावली.Narhari Zirwal, state Deputy Speaker in the Assembly  विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ  हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, सुभाष देसाई यांनी केली होती. या मागणीची दखल घेत झिरवळ यांनी ही नोटीस बजावली. ४८ तासांत म्हणजेच २७ जून रोजी सायंकाळी साडपाच वाजेपर्यंत या नोटीसीला उत्तर देण्याची सूचना बंडखोर आमदारांना करण्यात आली आहे. या कालावधीत उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, गटनेता निवड, १६ आमदारांना नोटीस यासंदर्भात न्यायालयात जाऊ, असं बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले. व्हिप हा सभागृहात बजावला जातो, नैसर्गिक न्यायाप्रमाणं विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीस देताना ७ दिवसांची मुदत द्यायला हवी होती, संख्याबळ असल्यानं गट स्थापन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे, असं ते म्हणाले.

या’ आमदारांना नोटीस

– एकनाथ शिंदे, अनिल बाबर,लता सोनावणे, संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर,रमेश बोरणारे,यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, तानाजी सावंत,प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडून ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत या नोटीस विरोधात न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव असल्याने ते असा निर्णय घेऊ शकत नाही असा प्रश्नही बंडखोर आमदाराच्या गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *