दूरस्थ शिक्षण ‘च्या एम.ए व एम. कॉम प्रवेशाला सुरुवात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Distance Education’ MA and M. com access start

दूरस्थ शिक्षण ‘च्या एम.ए व एम. कॉम प्रवेशाला सुरुवात

 ३० ऑक्टोबर पर्यंत करा अर्ज

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ (Open and Distance) अध्ययन प्रशाले अंतर्गत एम.ए व एम. कॉम २०२२ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना ३० ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.Savitribai Phule Pune University

मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, तत्वज्ञान व शिक्षणशास्त्र या विषयात एम.ए व एम.कॉम या दूरस्थ अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया प्रशालेच्या http://unipune.ac.in/SOL/ या संकेस्थळावर शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होत आहे.

ऑनलाईन नावनोंदणीसाठी ३० ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येईल. ऑनलाईन शुल्क भरून अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर सायंकाळी ५ पर्यंत आहे. तर अभ्यास केंद्रांवर प्रवेश अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर सायंकाळी ५ पर्यंत असणार आहे. मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशलेतर्फे याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *