बांधकाम महिला मजूर वर्गाला साडी वाटप

Chetan Tupe. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Distribution of sarees to women construction workers.

बांधकाम महिला मजूर वर्गाला साडी वाटप

आमदार चेतन दादा तुपे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम महिला मजूर वर्गाला साडी वाटप

Chetan Tupe. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Chetan Tupe

हडपसर : हडपसरचे लोकप्रिय व अभ्यासू आमदार चेतन दादा तुपे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने बांधकाम महिला मजूर वर्गाला साडी वाटप करण्यात आले .महिला व मजूर यांना साडीवाटप करून त्यांच्यावर प्रेमाची व मायेची सावली पांघरण्यात आली. हडपसर विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब,मजूर यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्याचे आश्वासन आमदार चेतन दादा तुपे पाटील यांनी दिले.

आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेलच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष लालासाहेब खलाटे, कार्याध्यक्ष दिलीप मोरे, चिटणीस गजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष दिगंबर मेमाणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघ व शहरचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *