Organized ‘Divya Samantha Ravi’ program at the university
विद्यापीठात ‘दिव्य स्वातंत्र्यरवि’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ललित कला केंद्र गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेवर आधारित ‘दिव्य स्वातंत्र्यरवि’ ह्या देशभक्तीपर नाट्यगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विभागाचे एम. ए. एकात्मिक, बी. ए. तृतीय , एम. ए. प्रथम व द्वितीय वर्षांतील विद्यार्थी नाट्यगीतांचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना संगीत विभाग प्रमुख डॉ. चैतन्य कुंटे ह्यांची आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे ह्यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ‘दिव्य स्वातंत्र्यरवि’ कार्यक्रमाला सुरूवात होईल.
रविवार, दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी विद्यापीठातील संत नामदेव सभागृह येथे सकाळी ९ वा. कार्यक्रमास सुरूवात होईल.
कार्यक्रम विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांना याचा आनंद घ्यावा असे आवाहन ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ.प्रवीण भोळे यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com