आयात केलेल्या त्रिकोणी वॉल्व्हमध्ये लपवून ठेवलेले 61.5 किलो सोने जप्त

DRI seizes 61.5 kg gold concealed in Triangle Valves imported at Air Cargo Complex, IGI Airport, New Delhi

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक संकुलातून आयात केलेल्या त्रिकोणी वॉल्व्हमध्ये लपवून ठेवलेले 61.5 किलो सोने जप्त

नवी दिल्ली : “गोल्डन टॅप” हे सांकेतिक नाव असलेल्या गुप्तपणे केलेल्या   गुप्तचर ऑपरेशनअंतर्गत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या  (डीआरआय) अधिकार्‍यांनी 11 मे 2022 रोजी ,लपवूनDRI seizes 61.5 kg gold concealed in Triangle Valves importedत्रिकोणी वॉल्व्हमध्ये लपवून ठेवलेले 61.5 किलो सोने जप्त हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News सोन्याची तस्करी केली जात असल्याच्या संशयावरून, दिल्ली हवाई मालवाहतूक संकुलामध्ये, विमानमार्गे आयात मालाची खेप रोखली.

या मालाच्या खेपेमध्ये त्रिकोणी  व्हॉल्व्ह असल्याचे घोषित करण्यात आले होते , या मालाची खेप चीनच्या ग्वांगझू येथून जपान एअरलाइन्सच्या विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली होती.

गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या काटेकोर  आणि प्रदीर्घ तपासणीनंतर, मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या त्रिकोणी व्हॉल्व्हमध्ये 24 कॅरेट सोने लपवून ठेवलेले आढळले.

क्लिष्ट पद्धतीने हे सोने लपवलेले होते , त्यामुळे ते शोधून काढण्याची प्रक्रिया वेळ घेणारी होती आणि ती  काळजीपूर्वक  करणे आवश्यक होते. महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांनी  संकलित  केलेली विशिष्ट गुप्त माहिती नसती तर ते सोने पकडले गेले नसते. कसून तपासणीनंतर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांना मालाच्या खेपेतून, 32.5 कोटी.रुपये बाजारमूल्याचे  99 टक्के शुद्ध  61.5 किलोग्राम सोने जप्त करण्यात यश मिळाले.

हवाई मालवाहतुकीद्वारे आणि कुरिअरच्या माध्यमातून आलेल्या मालातून महसूल गुप्तचर संचालनालयाने अलीकडेच केलेल्या सोने जप्तीच्या कारवायांनंतर हे नवीन प्रकरण समोर आले आहे.

या कारवायांमध्ये , मे 2022 मध्ये लखनौ आणि मुंबईमध्ये 5.88 कोटींहून अधिक किंमतीचे 11 किलो सोने जप्त करण्यात आले होते आणि त्याआधी नवी दिल्ली येथे, जुलै 2021 मध्ये कुरिअरद्वारे आलेल्या मालाच्या खेपातून 8 कोटी रुपये किमतीचे 16.79 किलो सोने आणि त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये हवाई मार्गे आलेल्या मालाच्या खेपेतून  39.31 कोटी रुपये किंमतीचे 80.13 किलो सोने जप्त केल्याचा समावेश आहे.

लपवण्याच्या अशा बनवाबनवीच्या अत्याधुनिक पद्धती शोधण्याची  डीआरआय ची क्षमता या जप्तीच्या कारवायांमुळे अधिक बळकट होते आणि भारताच्या आर्थिक सीमांवर तडजोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्याचे काम करते. या गुन्ह्यांतील गुन्हेगारांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय  कटिबद्ध आहे.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *