देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान

Droupadi Murmu takes oath as India's 15th President देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान हडपसर मराठी बातम्या Hadapsar News Hadapsar Latest News

Droupadi Murmu takes oath as India’s 15th President

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान

नवी दिल्ली :  भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री, विविध राज्यपाल, मुख्यमंत्री, विविध देशांचे उच्चायुक्त, सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.Droupadi Murmu takes oath as India's 15th President देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News Hadapsar Latest News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी व्यक्ती आणि या पदावर असलेल्या दुसऱ्या महिला आहेत. शपथ घेतल्यानंतर संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांनी सर्वांना संबोधित केलं. स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत आपल्याला ‘सबका प्रयास और सबका कर्तव्य’ या आधारे मार्गाक्रमण करायचं आहे. देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रवास सर्वांना एकत्रितरित्या करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

देशातले नागरिक, विशेषकरुन युवा आणि महिलांचं कल्याण हे माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल, या शब्दात त्यांनी देशवासियांना आश्वस्त केलं. देशातले युवक केवळ स्वतःचं भविष्य घडवत नसून देशाचं भविष्य घडवत आहेत. त्यासाठी राष्ट्रपती म्हणून मी कायम पाठिंबा देईन, असंही त्या म्हणाल्या.

देश नव्या विचारांनी नव्या युगाचं स्वागत करण्यासाठी कटीबद्ध आहे. प्रत्येक क्षेत्रात देश विकासाचं नवं पाऊल टाकतो आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोना संकटाच्या काळात देशानं केलेल्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला. तसंच संथाल, पैका, कोल, भिल क्रांती, बिरसा मुंडा यांचा उल्लेख राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात केला.
देशाच्या दूरवरच्या भागातली एक गरीब महिला देशाची राष्ट्रपती होत आहे, हेच भारतीय लोकशाहीचं सौंदर्य असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यावेळी म्हणाल्या. राष्ट्रपतीपदावर पोहोचणं हे आपलं एकटीचं यश नसून भारतातल्या प्रत्येक गरिबाचं यश असल्याचं त्या म्हणाल्या. या पदासाठीचं आपलं नामांकन हे भारतातली गरीब जनता केवळ स्वप्न पाहूच शकत नाही, तर ती पूर्ण देखील करू शकते, याचा पुरावा असल्याचं त्या म्हणाल्या.
शपथविधी पूर्वी सकाळी त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. शपथविधी नंतर मुर्मू राष्ट्रपती भवनावर रवाना झाल्या. तिथं तिन्ही सेना दलांच्या वतीनं त्यांना सलामी देण्यात आली आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ झाला.
स्वातंत्र्याच्या शतकीमहोत्सवापर्यंत ‘सबका प्रयास और सबका कर्तव्य’ या आधारे मार्गक्रमण करण्याचं राष्ट्रपतींचं देशवासियांना आवाहन द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळणं हा देशासाठी, विशेषतः देशातल्या  गरीब, उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी भावनिक क्षण असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

द्रौपदी मुर्मू  भारताच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्याचं  संपूर्ण देशानं मोठ्या अभिमानानं पाहिलं. राष्ट्रपती मुर्मू यांनी आशा आणि करुणेचा संदेश दिला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मुर्मू यांनी देशाच्या कामगिरीवर भर दिला असून, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यांनी भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन दिला आहे, मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या फलदायी कारकिर्दीसाठी शुभेच्छा,  असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

राष्ट्रपती प्रोफाइल

संथाल समुदायात जन्मलेल्या, मुर्मू यांनी १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीमध्ये नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली आणि
२००० मध्ये ओडिशा सरकारमध्ये मंत्री आणि नंतर १८ मे २०१५ मध्ये झारखंडचे राज्यपाल झाल्या.

देशातील सर्वात दुर्गम आणि अविकसित जिल्ह्यात गरिबीशी झुंजत मुर्मूयांनी आपली पावले उचलली. सर्व अडचणींवर मात करून, त्यांनी भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयातून कला विषयात पदवी मिळवली आणि ओडिशा सरकारमध्ये सिंचन आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम केले.  नंतर त्यांनी रायरंगपूर येथील श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटरमध्ये मानद सहाय्यक शिक्षिका म्हणूनही काम केले.

मुर्मूचे लग्न श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाले होते आणि त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. पती आणि दोन मुलगे गमावल्यामुळे त्यांचे जीवन वैयक्तिक शोकांतिकेने चिन्हांकित झाले होते. मुर्मूची मुलगी इतिश्री हिचे लग्न गणेश हेमब्रमशी झाले आहे.

भाजपमध्ये, मुर्मू ह्या ओडिशातील अनुसूचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष होत्या. २०१० मध्ये त्या भाजपच्या मयूरभंज (पश्चिम) युनिटच्या जिल्हाध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि २०१३ मध्ये पुन्हा निवडून आल्या. त्याच वर्षी त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी (एसटी मोर्चा) चे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.

रायरंगपूर येथील दोन वेळा माजी आमदार राहिलेल्या, मुर्मू यांनी २००९ मध्ये त्यांची विधानसभेची जागा राखली जेव्हा बीजेडीने मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जिंकलेल्या राज्य निवडणुकांच्या आठवडे आधी भाजपशी संबंध तोडले होते.

मुर्मू यांना ओडिशा विधानसभेने २००७ मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट आमदाराचा नीलकंठ पुरस्कार प्रदान केला होता. ओडिशा सरकारमध्ये वाहतूक, वाणिज्य, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन यांसारखी मंत्रालये हाताळतानाचा त्यांना विविध प्रशासकीय अनुभव आहेत.

६४ व्या वर्षी राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आतापर्यंतच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. तसंच स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. १९९७ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ओडिशातल्या रायरंगपूरमध्ये नगरसेविका म्हणून  निवडून आल्या. याच विधानसभा  मतदारसंघाचं त्यांनी २ वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. या काळात त्या ओडिशा सरकारमध्ये वाणिज्य, परिवहन, पशुधन मंत्रीही होत्या. १८ मे २०१५ रोजी त्यांनी झारखंडच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. गेल्यावर्षी १२ जुलैपर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. झारखंडच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *