Drug stock worth Rs 1400 crore seized in Nalasopara
नालासोपाऱ्यात १४०० कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त
मुंबई: मुंबई पोलिसांनी नालासोपाऱ्यातून १४०० कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानं काल ही कारवाई केली. यात ७०१ किलो वजनाचे अंमल पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
मार्च महिन्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या काही जणांनी गोवंडीतून अटक करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थांचा पुरवठादाराला काल ही अटक करण्यात आली आहे. आफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस उर्फ किंग याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आज अटक केली. त्याच्याकडून २४ लाख सहा हजारांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
वरळी येथील अंमली विरोधी कक्षाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतील आरोपींनी नालासोपारा शहरातून एमडी हा अंमली पदार्थ विकत घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर नालासोपाऱ्याच्या हनुमान नगर परिसरातील सीताराम बिल्डिंगच्या गाळा नंबर १ मध्ये बुधवारी धाड टाकली.
पोलिसांना तपासात प्राथमिक माहिती मिळाली की, या आरोपीने रसायन शास्त्रामध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे शिक्षण घेतलेले असून वेगवेगळे केमिकल एकत्र करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून एमडी अंमली पदार्थ बनविण्याचे ज्ञान त्याने आत्मसात केले आहे. तो मागणीप्रमाणे अंमली पदार्थ बनवून देत होता. तसेच तो स्वतःची ओळख लपवण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करून अंमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय करत होता.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com