Due to the shortage of coal, large scale load shedding has started in the neighbouring states also – Minister of State for Energy
कोळसा कमी मिळत असल्यानं लगतच्या राज्यांमधेही मोठया प्रमाणात भारनियमन सुरु- ऊर्जा राज्यमंत्री
चंद्रपूर : कोळसा खाणी केंद्र सरकारच्या अधीन असून, या खाणींतून सर्वच राज्यांना कोळशाचा साठा कमी मिळत असल्यानं लगतच्या राज्यांमधेही मोठया प्रमाणात भारनियमन सुरु असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं.
त्यांनी आज चंद्रपूरच्या महाऔष्णिक केंद्रातल्या कोळशाच्या साठ्याची पाहणी केली आणि पावसाळ्यात कोळशाच्या नियोजनासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. राज्यात भारनियमनाचं संकट रोखण्यासाठी महानिर्मित आणि महावितरण अधिकारी तारेवरची कसरत करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau.