सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसमध्ये सल्लागार मंडळाची स्थापना होणार

An advisory board will be set up in the Congress under the chairmanship of Sonia Gandhi

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसमध्ये सल्लागार मंडळाची स्थापना होणार

उदयपूर : काँग्रेस समोर असलेली आव्हानं आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एका सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. राजस्थानमधल्या उदयपूर इथं सुरू नवसंकल्प शिबिराच्या समारोपप्रसंगी केलेल्या भाषणात सोनिया गांधी यांनी ही घोषणा केली.

लवकरच या मंडळाची घोषणा होणार असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा यामध्ये समावेश असेल. पक्षाच्या केंद्रीय मंडळाच्या व्यतिरीक्त हे सल्लागार मंडळ असेल मात्र त्यांना निर्णयप्रक्रियेत कुठलाही हस्तक्षेप करण्याची मुभा नसेल. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षांतर्गत सुधारणांसाठी एका कृतीदलाहीची स्थापना केली जाणार आहे. हे कृती दल पक्ष रचना, विविध पक्षांतर्गत नेमणुका, निवडणूक आणि निधी व्यवस्थापन, जनसंपर्क यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. २-३ दिवसात या कृतीदलाची घोषणा होईल, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

जिल्हापातळीवरच्या काँग्रेसच्या जनजागरण अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला 15 जून पासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कन्याकुमारी ते काश्मिर भारत जोडो यात्रा या वर्षी गांधी जयंती पासून सुरू केली जाईल. यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व सक्रिय सदस्य सहभागी होतील असं ही  यावेळी सोनिया गांधी यांनी नमूद केलं.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *