BJP candidate Dyaneshwar Mhatre won in Konkan teachers constituency
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
अमरावती विभाग दुसऱ्या फेरीतही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिगांडे १ हजार ६०० मतांनी आघाडीवर
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ : महाविकास आघाडी पुरस्कृत सुधाकर अडबाले यांना १४ हजार ६९, तर भाजपा पुरस्कृत नागो गाणार यांना ६ हजार ३६६ मतं
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ: पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे ७ हजार ९२२ मतांनी आघाडीवर
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे २० हजार ७८ मत घेऊन आघाडीवर
रत्नागिरी : आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने खाते उघडले असून, भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. त्यांनी शेकपचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे पहिल्या पसंतीच्या क्रमानुसार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत ३५ हजार ६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलं. त्यापैकी १ हजार ६१९ मते बाद झाल्यानं ३३ हजार ४५० मतं वैध ठरली. विजयासाठी पहिल्या पसंतीची १६ हजार ७२६ मतं आवश्यक होती.
भाजपा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजार ६४८ मतं मिळाल्यानं ते विजयी झाले. विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना १० हजार ९९७ मतं मिळाली. मात्र म्हात्रे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झालेली नाही. या विजयाबद्दल उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांचं अभिनंदन केलं आहे. हा विजय म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारवर कोकणवासियांनी दाखवलेला विश्वास असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीतही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिगांडे १ हजार ६०० मतांनी पुढं होते.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात २६ हजार ९०१ वैध मतांपैकी महाविकास आघाडी पुरस्कृत सुधाकर अडबाले यांना १४ हजार ६९, तर भाजपा पुरस्कृत नागो गाणार यांना ६ हजार ३६६ मतं मिळाली.
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे ७ हजार ९२२ मतांनी आघाडीवर होते. त्यांना १५ हजार ७८४, तर तर महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांना ७ हजार ८६२ मतं मिळाली आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com