E-auction of confiscated vehicles
जप्त वाहनांचा ई-लिलाव
पुणे : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्हयांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहिर लिलाव ई-लिलाव पध्दतीने 12 मे रोजी सकाळी 10 वाजता ठेवण्यात आला आहे.
वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे, आळंदी रोड कार्यालय व वाघेश्वर पार्किंग, पुणे येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहिर ई-लिलावात एकूण 34 वाहने उपलब्ध आहेत. यात टूरिस्ट टॅक्सी, ट्रक, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा, खाजगी वाहन या वाहनांचा समावेश आहे.
लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहिल. याची वाहन मालकांनी नोंद घ्यावी. ई लिलावात सहभागी होण्यासाठी 9 ते 10 मे 2022 सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात हलके वाहनास रूपये 25 हजार व अवजड वाहनास रूपये 50 हजार रक्कमेचा R.T.O. Pune या नावाने कागदपत्र व अनामत धनाकर्ष सह नाव नोंदणी करून प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी. जीएसटी धारकांनाच ई-लिलावात सहभागी होता येईल. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगमपुल, पुणे या कार्यालयाशी संपर्क साधावा.
कोणतेही कारण न देता जाहिर ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकारी, पुणे यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत, असे पुणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
जप्त वाहनांचा ई-लिलाव