“E-Rupee” will change the way business is conducted – Reserve Bank Governor
“ई-रूपी” मळे व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीत बदल होणार- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
मुंबई : सरकारच्या आर्थिक उपाययोजना देशाच्या आर्थिक विकासाचं संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केलं आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात फिक्की आणि इंडियन बँक्स असोसिएशन अर्थात इबा यांच्या संयुक्त विद्यमानं फीबॅकची सभा घेण्यात आली.
2022-23 या कॅलेंडर वर्षात किसान क्रेडिट कार्ड कर्ज, शेतकऱ्यांना तसंच सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी देखील पूर्ण विकसित पद्धतीनं सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य सरकारनं त्यांच्या जमिनीच्या नोंदीही डिजिटल करणं आवश्यक असल्याचं शक्तीकांत दास यांनी सांगितलं.
ते म्हणाले की आरबीआय सणासुदीच्या काळात वस्तूंच्या विक्रीत लक्षणीय सुधारणा पाहत आहे. परिषदेत बोलताना दास म्हणाले की, प्रगत देशांमधील राजवटीत बदलामुळे आर्थिक धोरणात्मक कृती आणि धोरणातील बदलांमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये आर्थिक परिस्थिती घट्ट झाली आहे आणि आर्थिक स्थिरतेचे धोके वाढले आहेत.
यावेळी बोलताना शक्तीकांत दास म्हणाले की, सध्याची आंतरराष्ट्रीय मंदी, बाजारपेठेची स्थिती आणि बाजारपेठेसमोरील आव्हानं बघता मुल्य स्थिरता, शाश्वत विकास आणि चलनवाढ दर हे परस्पर अनन्य असण्याची आवश्यकता नाही. स्थानिक पातळीवरच्या महागाईवर सरकारचं बारीक लक्ष असून महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना राबवत असल्याचं दास यावेळी म्हणाले.
काल सेंट्रल बँक डिजिटल चलन चाचणी सुरू झाली आहे.ही एक ऐतिहासिक कामगिरी आणि ऐतिहासिक क्षण होता. यामुळे व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीत बदल होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
किसान क्रेडिट कार्ड कर्जावर गेल्या महिन्यात पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता ज्यामध्ये शेवटपर्यंत डिजिटायझेशन प्रक्रियेचा समावेश आहे. ही कर्ज मंजूर करण्याची एक डिजिटल प्रक्रिया आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत कर्ज मिळावं यासाठी आमचे प्रयत्न असल्याचं दास यांनी सांगितलं.
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात CBDC पूर्णपणे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असून आम्हाला ते काळजीपूर्वक कराव लागणार असल्याचे दास यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com