Early Intervention Centre Launched at Command Hospital Pune
पुणे येथील कमांड रुग्णालयात लहान मुलांसाठी जलद निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन) केंद्र सुरु
पुणे : भारतात दरवर्षी जन्मलेल्या 27 दशलक्ष मुलांपैकी सुमारे 10% मुले कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाने, व्यंगामुळे किंवा विलंबाने होत असलेली प्रगती यामुळे ग्रस्त असतात त्यामुळे पुढील आयुष्यात त्यांना गंभीर अपंगत्व येते. यांसारख्या समस्यांचे लावकरात लवकर निदान झाल्यास आणि या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने थेरपिस्टच्या चमूने जलद उपचार सुरु केल्याने अपंगत्व कमी करण्याची एक अनोखी संधी प्राप्त होते आणि पिडीत मुलाला त्याची जास्तीत जास्त क्षमता साध्य करण्यासाठी मदत होते.
या संकल्पनेतून , भारत सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके ) सुरू केला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जलद अपंगत्व निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन ) केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांना अनुसरून,सशस्त्र दलांनी पुणे येथील कमांड रुग्णालयात (दक्षिण कमांड ) पहिले जलद अपंगत्व निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन ) केंद्र (ईआयसी) स्थापन केले आहे, 8 ऑगस्ट 2022 रोजी आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशनच्या क्षेत्रीय अध्यक्ष अनिता नैन यांनी ,रुग्णालयाचे कमांडंट मेजर जनरल एम.एस . तेवटिया यांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन केले.
मुलांमध्ये असलेल्या अपंगत्वाच्या विविध पैलूंवर काम करण्यासाठी आणि त्यांना सर्वोत्तम उपचार आणि त्याचे संभाव्य परिणाम सुनिश्चित करण्यासाठी या केंद्रात अनेक थेरपिस्ट – क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, विशेष शिक्षक, पोषणतज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत.
या रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक मुलाची तसेच बालरोग तज्ञांकडे आणि आणि बालरोग न्यूरोलॉजी बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक मुलाची कोणत्याही दोष किंवा अपंगत्वाच्या जलद निदानाच्या अनुषंगाने पूर्व तपासणी केली जाईल, अशी माहिती या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ,बालरोग विभागाचे प्रमुख कर्नल कार्तिक राम मोहन यांनी दिली. या तपासणीदरम्यान ज्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे अपंगत्व किंवा विलंबाने होत असलेली प्रगती आढळली तर त्यांची ताबडतोब नावनोंदणी जलद अपंगत्व निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन ) केंद्रामध्ये केली जाईल आणि अनुकूल परिणाम साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून , जन्मापासून ते 6 वर्षे वयाच्या मुलांवर सर्वोत्तम तज्ज्ञांकडून आवश्यक उपचार सुरू केले जातील.
समग्र उपचार कार्यक्रमांच्या अभावामुळे, अपंग मुलांच्या प्रगतीमध्ये अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने अशा प्रकारच्या केंद्राची बालरोगतज्ज्ञ यांना गरज भासत होती.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com