Eco friendly sky lantern making workshop concluded at Sadhana Vidyalaya
साधना विद्यालयामध्ये पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा संप्पन
हडपसर : पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,कलात्मकता आणि कारककौशल्य वाढवणे गरजेची असतात. शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आली तर ते उत्तम कलाकार होऊ शकतात. जीवनाकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याची सौंदर्यदृष्टी विद्यार्थ्यांमध्ये येऊ शकते.याच उद्देशाने साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज हडपसर मधील राष्ट्रीय हरित सेना योजनेमार्फत पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना “.पर्यावरणपूरक आकाशकंदील वापरल्याने प्लास्टिकचा वापर कमी होऊ शकतो तसेच प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणामही कमी होऊ शकते.
प्रत्येकाने आपल्या निसर्गाचा व पर्यावरणाचा विचार करून पर्यावरणपूरक आकाशकंदील वापरणे गरजेचे आहे, पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी”, असे मत साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्डाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी मांडले.
कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, ज्युनियर काॅलेज विभाग प्रमुख धनाजी सावंत, विजय सोनवणे ,पांडूरंग गाडेकर ,राष्ट्रीय सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे, साधना खोत,कुमार शेवाळे, सविता माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यशाळेत “ विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणाचे व निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धती तसेच वस्तूंचा वापर केला पाहिजे, तसेच सर्व सण व उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने प्रत्यक्ष आपल्या कृतीयुक्त सहभागाने साजरे करणे गरजेचे आहे, त्यासाठी अशा पर्यावरणपूरक कार्यशाळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत”, असे मत राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख शैलेश बोरुडे यांनी व्यक्त केले.
साधना विद्यालयातील शिक्षक शैलेश बोरुडे, साधना खोत यांनी प्रत्यक्ष पर्यावरणपूरक आकाशकंदील कशा पद्धतीने बनवतात याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले.त्यानंतर कार्यशाळेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com