ED notice to Amnesty India, Akar Patel; Under FEMA, Rs. 61.72 crore
अँम्नेस्टी इंडिया, आकार पटेल यांना ईडीची नोटीस; FEMA अंतर्गत रु. 61.72 कोटी दंड
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अँम्नेस्टी इंडिया इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (AIIPL) आणि त्याचे CEO आकार पटेल यांना फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अँक्ट (FEMA) च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तसेच काल सुमारे ६२ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
ईडीने म्हटले आहे की अँम्नेस्टी इंटरनॅशनल, यूके भारतात आपल्या एनजीओ क्रियाकलापांचा विस्तार करण्यासाठी थेट परदेशी गुंतवणुकीच्या मार्गाचा अवलंब करून आपल्या भारतीय संस्थांद्वारे मोठ्या प्रमाणात परदेशी योगदान पाठवत आहे.
एजन्सीने म्हटले आहे की, फॉरेन कंट्रिब्युशन रेग्युलेशन अँक्ट (FCRA) टाळण्यासाठी, एआयआयपीएल गृह मंत्रालयाने एफसीआरए अंतर्गत एआयआयएफटी आणि इतर ट्रस्टना पूर्व नोंदणी किंवा परवानगी नाकारूनही, अशा प्रकारच्या क्रियाकलाप राबवत आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com