ED raids in three companies Pay-TM, Razor-Pay and Cash-Free
पे-टीएम, रेजर-पे आणि कॅश-फ्री या तीन कंपन्यांमध्ये ईडीची छापेमारी
बंगळुरू : चिनी कंपनीच्या मालकीच्या कर्जाबाबतच्या एका अवैध ऍप विरोधात सुरु असलेल्या तपासामध्ये ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं, पेमेंट गेटवे – पे-टीएम, रेजर-पे आणि कॅश-फ्री या तीन कंपन्यांमध्ये काल छापेमारी केली.
या कंपन्यांच्या मालकीच्या बंगळुरू इथल्या आस्थापनांसह सहा ठिकाणी ईडीनं तपास मोहीम राबवली. या कारवाईत चिनी नागरिकांच्या नियंत्रणाखालच्या कंपन्यांचे व्यापार परवाने आणि बँक खात्यांमधली १७ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
चिनी व्यक्तींना या कंपन्यांचे बनावट संचालक बनवण्यासाठी भारतीय नागरिकांचे बनावट दस्त-ऐवज वापरले गेले आणि कमाईचा अवैध स्रोत म्हणून त्याचा उपयोग केला गेला असा ईडीचा आरोप आहे. स्मार्ट फोनवर आधारित असलेल्या चिनी कंपनीच्या या कर्जबाबतच्याऍप्स विरोधात दाखल झालेल्या तक्रारींमुळे भारतीय तपास यंत्रणा त्यावर लक्ष ठेवून आहेत.
स्मार्टफोनवर आधारित चायनीज इन्स्टंट लोन ऍप्सअनेक आरोपांनंतर भारतीय एजन्सींच्या स्कॅनरखाली आहेत. गेल्या महिन्यात, दिल्ली पोलिसांनी अशा 100 हून अधिक ऍप्सच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आणि त्यांच्या अर्जांद्वारे त्वरित कर्ज देण्याच्या बहाण्याने पैसे उकळल्याप्रकरणी 22 लोकांना अटक केली. डेटा चोरीचा आणि घेतलेल्या कर्जातून पैसे फसवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com