Union Minister of State for Agriculture asserted that agriculture and farmers should be protected from the effects of environmental change
पर्यावरण बदलाच्या दुष्परिणामांपासून शेती आणि शेतकऱ्यांना जपलं पाहिजे असं केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचं प्रतिपादन
आंबा फळांवरच्या कीड निर्मूलन उपाययोजनांवर एपीपीपीसी आणि कृषी मंत्रालयाच्या वतीने 19 ते 23 जून पर्यंत नवी मुंबईत वाशी इथे कार्यशाळेचे आयोजन
मुंबई : आंबा फळांवर पडणाऱ्या किडींचे उच्चाटन करण्यासाठी राबवता येऊ शकणाऱ्या उपाययोजनांवर APPPC (आशिया पॅसिफिक प्लान्ट प्रोटेक्शन कमिशन), या आशिया-प्रशांत क्षेत्र रोप संरक्षण आयोगाच्या कार्यशाळेचे, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. APPPC आणि कृषी मंत्रालयाने ही कार्यशाळा संयुक्तपणे, नवी मुंबईतल्या वाशी इथे 19 ते 23 जून 2023 पर्यंत आयोजित केली आहे. या परिषदेत २५ देशांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच ऑनलाइन पध्दतीने सहभागी झाले आहेत.
पर्यावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, विकसनशील देशांनी शेती आणि शेतकरी यांना जपणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केलं आहे. त्या आज नवी मुंबईतल्या वाशी इथं एपीपीपीसी अर्थात आशिया- प्रशांत वनस्पती संरक्षण आयोगानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होत्या.
अशाप्रकारची कार्यशाळा केवळ त्या भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच आवश्यक नाही तर जागतिक योगदानामध्ये भारताच्या वाढत्या जबाबदारीचे एक प्रतीक आहे, असे करंदलाजे यांनी 19 ते 23 जून 2023 सांगितले.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यामुळे केवळ किड नियंत्रणच नव्हे खतांचा कमी वापर करण्यावरही सरकारचा भर आहे. पायाभूत सुविधा, निर्यातकेंद्री शेती व्हावी यासाठी काय करता येईल, शेतकऱ्यांच्या विकासाकरता काय करता येईल, याबाबत सहभागी २५ देशांनी विचार करावा, असं आवाहन करंदलाजे यांनी केलं.
देशात आंब्याच्या १ हजार २०० जाती आहेत. त्यापैकी ३० ते ३५ जातींना व्यावसायिक मान्यता आहे. त्यापैकी १२ जातींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. भारत चारशे कोटी रुपयांचा आंबा निर्यात करतो, तर सुमारे ८०० कोटी रुपयांच्या आंबा पल्पची विक्री केली जाते. आंब्याची १ हजार कोटी रुपयांची उत्पादनं तयार केली जातात. त्यामुळे फळ माशीबाबत संशोधन होणं आवश्यक असल्याचं अपेडाचे संचालक तरूण बजाज यांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com