महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या प्रयत्नांना यंदाचा अर्थसंकल्प देईल नवी गती”

Infrastructural projects inaugurated in Mumbai will make life of citizens more bearable - Prime Minister मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल - प्रधानमंत्री हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

“This year’s budget will give new momentum to the efforts of women-led development”

महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या प्रयत्नांना यंदाचा अर्थसंकल्प देईल नवी गती”

महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

“महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसून येत आहेत आणि आम्हाला देशाच्या सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल जाणवत आहेत”Infrastructural projects inaugurated in Mumbai will make life of citizens more bearable - Prime Minister मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल - प्रधानमंत्री हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्ली : पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी “महिलांचे आर्थिक सक्षमीकरण” या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कल्पना आणि सल्ला मिळविण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या अर्थसंकल्प पश्चात 12 वेबिनारच्या मालिकेतील हा 11वा वेबिनार होता.

पंतप्रधानांनी या वर्षीचा अर्थसंकल्प देशासाठी शुभ असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प भविष्यातील अमृत काळच्या दृष्टिकोनातून पाहिला आणि तपासला गेला आहे. देशातील नागरिकही या उद्दिष्टांशी जोडून पुढील 25 वर्षांचा वेध घेत आहेत, हे देशासाठी चांगले लक्षण आहे, असे ते म्हणाले.

महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधे दूरदृष्यप्रणालीमार्फत ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी केलेल्या तरतुदींची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं बांधून पूर्ण झाली आहेत त्यातली बहुतांश महिलांच्या नावावर असून महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना साडेसातटक्के व्याज दर देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

महिला बचत आणि स्वयंसहाय्यता गटांची भूमिका, श्रीअन्न उत्पादनात आदिवासी महिलांच्या पारंपरिक शेतीच्या ज्ञानाचं योगदान, सहकारक्षेत्रात महिलांचा सहभाग, इत्यादींचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *