Efforts to provide electricity to farmers 12 hours a day
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न
आगामी काळात शेतकर्यांना 12 तास वीज देण्याचा प्रयत्न करणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
सोलर फिडरसाठी शेतकऱ्यांची जमीन हेक्टरी ७५ हजार रूपये भाड्याने घेणार
सोलापूर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर सौरउर्जेवर आणणार आहे. यातून चार हजार मेगावॅट वीजेचे उद्दिष्ट ठेवले असून यातून येत्या काळात शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ते काल सोलापूर जिल्ह्यात बार्शी इथं विविध विकास कामांच्या ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजनप्रसंगी बोलत होते. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना विजेची कोणतीही अडचण भासू नये यासाठी विजेचे सर्व फिडर सौर उर्जेवर आणणार असून; यातून चार हजार मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे असं फडणवीस यावेळी म्हणाले.
सोलर फिडरसाठी शेतकऱ्यांची जमीन हेक्टरी ७५ हजार रूपये भाड्याने घेणार असून यातून शेतकऱ्यांना शाश्वत भाडे मिळेल. याबरोबरच ३० वर्षांनी जमीन परत दिली जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडणार आहे.
बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी 700 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून येत्या तीन वर्षात ही योजना पूर्णत्वाला जाईल. यामुळे 12 हजार 250 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जानेवारीपासून कामाला सुरूवात होणार असल्यानं अवर्षणग्रस्त तालुका पूर्णपणे सिंचनाखाली येऊन बार्शी तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com