एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस Eknath Shinde is the new Chief Minister of Maharashtra, BJP leader Devendra Fadnavis as the Deputy Chief Minister हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Eknath Shinde is the new Chief Minister of Maharashtra, BJP leader Devendra Fadnavis was sworn in as the Deputy Chief Minister

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली,तर उपमुख्यमंत्री पदाची भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांना सरकारचा भाग होण्यास आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास सांगितल्यानंतर श्री. फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री Eknath Shinde is the new Chief Minister of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विनंतीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

एका ट्विटमध्ये श्री शाह म्हणाले की, हा निर्णय श्री. फडणवीस यांची महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची भावना दर्शवतो.

दरम्यान, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकांच्या भल्यासाठी मोठे मन दाखवून पक्षाने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणतेही पद मिळवणे हे पक्षाचे ध्येय नसून देशाची आणि राज्यातील जनतेची सेवा करणे हेच मुख्य ध्येय भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्द

एकनाथ शिंदे १९८० च्या दशकात शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे शिवसेनेत दाखल झाले. शाखाप्रमुख म्हणून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली.

१९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना ४० दिवस तुरुंगवास सोसावा लागला होता. १९९७ मधे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले.

२००१ ते २००४ या काळात ते महानगरपालिकेचे सभागृह नेते होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले.

त्यानंतर वर्षभरात दीघे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतरच्या सर्व विधानसभा निवडणुकांमधे ते सातत्यानं निवडून आले आहेत.

२०१४ च्या निवडणुकीनंतर अल्पकाळ विधानसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून काम केल्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांनी मिळाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधे ते नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *