एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

Eknath Shinde एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Eknath Shinde to be sworn in as CM

एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज सकाळी राजभवनात पोहोचले. यावेळी त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला. जो राज्यपालांनी स्वीकारला. राज्यपालांनी दोन्ही नेत्यांना मिठाई खाऊ घातली.Eknath Shinde to be sworn in as CM एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी राजभवनात संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली. (Eknath Shinde become in Maharashtra Chief Minister)

एकनाथ शिंदे आज राज्याच्या २० व्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज केवळ शिंदे यांचा शपथविधी होईल,

इतर मंत्र्याविषयी नंतर निर्णय घेतला जाईल. आपण स्वतः या सरकारला बाहेरून पाठिंबा देणार आहे, अस देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस आणि शिंदे यांनी आज संध्याकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. यावेळी भाजपा नेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या सह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आज भाजपा कडे अपक्षासह १२० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून फडणवीस यांनी हे पद सोडलं. याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीस यांचे आभार मानतो, असं शिंदे म्हणाले.

मला ३९ शिवसेनेचे आणि इतर अपक्ष असा ५० जणांचा पाठिंबा आहे. आम्ही सर्वांनी बाळासाहेब, आनंद दिघे यांची भूमिका घेऊन लढा दिला. या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं शिंदे यावेळी म्हणाले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *