काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यात ९६ टक्के मतदान

Image of Election process हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

96 percent polling in the state for the election of the Congress President

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यात ९६ टक्के मतदान

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक वर्षांनंतर निवडणूक हेात आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची अनेक दिवसांपासुन चर्चा सुरु होती. अखेर अध्यक्ष पदासाठी आज मतदान पार पडले.Image of Election process हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका वड्रा, राहुल गांधी, पी. चिदंबरम, जयराम रमेश आणि इतर नेते तसंच पक्षसदस्यांनी मतदान केलं.

काँग्रेस कमिटीने दिलेले बारकोड असलेले ओळखपत्र तसेच फोटो ओळखपत्राची तपासणी करूनच मतदारांना प्रवेश देण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि शिशिर थरुर रिंगणात आहेत. या उमेदवाऱ्यांना सुमारे 9800 राज्य प्रतिनिधीनी मतदान केले आहे.

राज्यातील 561 प्रदेश प्रतिनिधी पैकी आज 542 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. खरगे की थरूर या उमेदवारांपैकी कोण अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसेल, याचा फैसला 19 ऑक्टोबरला होणार आहे.

राज्यात प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या, टिळकभवनात ५६१ पैकी ५४२, म्हणजे ९६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात टपालाद्वारे केल्या जाणाऱ्या मतदानाचाही समावेश आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *