Elections to local bodies in the state should be held as soon as possible – Ajit Pawar
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात
– अजित पवार
पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजे, असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. “९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत आहे.” असं म्हणत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये या निवडणुका होणं अपेक्षित होतं. मात्र, अद्यापही या निवडणुका लागलेल्या नाहीत. १० महिने उशीर झाला आहे. अजित पवार म्हणाले, राजकीय स्थित्यंतरामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. सहकाऱ्यातल्या निवडणुका लागल्या. त्याचा निकालही लागला. पण एखादी गोष्ट न्यायवस्थेच्या पुढे असल्याने अंतिम निर्णय न्यायव्यवस्थेचा असतो. पण या सगळ्यात सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांनी आता एक निर्णय घेतला पाहिजे.
राज्यात महागाई, बेरोजगारी असे अनेक महत्त्वाचे प्रश्नही आहेत. पण ते बाजूला ठेऊन ज्यांची काही गरजच नाही, अशा विषयांवर चर्चा करत बसतो. त्यावर विचार व्हायला हवा असंही पवार यांनी म्हटलं
राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, पवार यांनी, अशा गोष्टींपेक्षा राज्यात महागाई, बेरोजगारी असे अनेक महत्वाचे प्रश्न असल्याकडे लक्ष वेधलं.
कर्नाटकातला बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणण्याची मागणी अनेक वर्षांपासून असल्याचं ते म्हणाले. सीमाभागातल्या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासंदर्भात राज्य सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com