Electric buses and cars are the future of transport and will revolutionize the entire sector: Nitin Gadkari
इलेक्ट्रिक बस आणि कार हे वाहतुकीचे भविष्य, यामुळे संपूर्ण क्षेत्रात क्रांती होणार
– नितीन गडकरी
देशात लवकरच विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट बांधले जाणार.
सर्व महामार्गांवर चार्जिंग स्टेशन
लखनौ : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज काल लखनौ इथे यूपी जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 मध्ये ई-मोबिलिटी, वाहने आणि भविष्यातील गतिशीलता या विषयावरील सत्राला संबोधित केले. या सत्राला “ई-मोबिलिटी वाहन आणि भविष्यातील गतिशीलता” असे नाव देण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह, नीती आयोगाचे सीईओ परमेश्वरन अय्यर आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
भारत हा जगातील ऊर्जा निर्यातदार देश बनणार आहे, जे पंतप्रधानांचे स्वप्न आहे, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले. हे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना उत्तर प्रदेशमध्ये येण्याचे आवाहन केले, कारण त्यांना जमीन, कुशल मनुष्यबळ, कनेक्टिव्हिटी आणि कमी लॉजिस्टिक खर्च आणि ई-मोबिलिटीमध्ये मोठी क्षमता आवश्यक असलेल्या गोष्टी
उत्तर प्रदेशमध्ये आहे.
गडकरी म्हणाले भारतातील एकूण नोंदणीकृत विजेवरील वाहनांपैकी (ईव्ही) 25% उत्तर प्रदेशमध्ये असून, इथे फ्लेक्स हायब्रीड वाहनांची बाजारपेठ निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे. कानपूर, लखनौ, नोएडा, गाझियाबाद आणि मेरठ ही शहरे ई-वाहने आणि लिथियम बॅटरीजची प्रमुख उत्पादन केंद्रे बनत आहेत.
ते म्हणाले की इलेक्ट्रिक बस आणि कार हे वाहतुकीचे भविष्य आहेत आणि संपूर्ण क्षेत्रात क्रांती घडवून आणतील आणि लाखो रोजगार निर्माण करतील. गडकरी म्हणाले की, लवकरच देशातील विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट बांधले जातील.
ते म्हणाले की इथेनॉलमुळे उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था बदलू शकते कारण येथे उसाचे मोठे उत्पादन होते. त्यातून सुमारे 10 लाख नवीन रोजगार निर्माण होतील. 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केवळ ऑटोमोबाईल क्षेत्रातूनच उत्तर प्रदेशात येऊ शकते.
ते म्हणाले की उत्तर प्रदेश इथेनॉलचा सर्वात मोठा उत्पादक असून, दुसर्या पिढीचा लो-कार्बन इथेनॉल विकसित करायला प्राधान्य देत आहे.
शेतकऱ्यांना अन्नदाता असण्याबरोबरच ऊर्जा दाता देखील बनवत असून नवा भारत सुरक्षित, पुनर्वापर करण्याजोग्या आणि शाश्वत अशा स्वदेशी उत्पादनांना नेहमीच प्रोत्साहन देतो, आणि गतीशीलतेच्या क्षेत्रात हरित ऊर्जा आणि हरित अर्थव्यवस्थेसाठी जागा निर्माण करतो असे गडकरी म्हणाले.
इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरीच्या मुद्द्यावर नितीन गडकरी म्हणाले की, सरकार अनेक पातळ्यांवर ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार आता सर्व महामार्गांवर चार्जिंग स्टेशन बनवत आहे.
श्री. गडकरी म्हणाले की वाहन उद्योगात मोठी क्षमता आहे आणि जुनी वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सुटे भाग निर्मिती उद्योग देखील वाढेल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, इलेक्ट्रिक वाहने हे वाहतुकीचे भविष्य आहे आणि प्रत्येक 15 किलोमीटर अंतरावर आणि पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारले पाहिजेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com