Eligibility (SET) Examination for the post of Assistant Professor on 26th March
सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रतेसाठीची (सेट) परीक्षा २६ मार्च ला
३२ विषयांमध्ये २६५ केंद्रांवर होणार परीक्षा
पुणे : सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा ही २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार असून यासाठी १ लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला आहे.
उमेदवारांना प्रवेशपत्र देखील उपलब्ध करून देण्यात आले असून महाराष्ट्र आणि गोवा येथील अनुक्रमे २५८ व ७ अशा एकूण २६५ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सेटचे सदस्य सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा आहे.
यासाठीची सर्व तयारी सेट विभागाकडून करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी मूळ ओळखपत्र व परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत आणावे असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली असल्याचेही डॉ.पवार यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com