Eligibility Test (SET) for the post of Assistant Professor on 26th March
सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
पुणे : सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी घेण्यात आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थी ३० नोव्हेंबर पर्यंत यासाठी अर्ज करू शकतात.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची ३८ वी परीक्षा ही २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणार असून यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेटचे सदस्य सचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.
यासाठी उमेदवारांनी १० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत https://setexam.unipune.ac.in या संकेस्थळावर अर्ज करावा. तर विलंब शुल्कासहित अर्ज करण्याची मुदत १ डिसेंबर ते ७ डिसेंबर अशी असणार आहे.
परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी संकेस्थळाला भेट द्यावी असे आवाहन सेट विभागातर्फे करण्यात आले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com