राज्यात २०२३ मधे तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिकीची पुस्तकं मराठीत

Chandrakant Patil. BJP State President

Technical education and engineering books will be available in Marathi in the state in 2023

राज्यात २०२३ मधे तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिकीची पुस्तकं मराठीत उपलब्ध होणार

नाशिक : राज्यात पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंगप्रमाणेच वैद्यकीय तसंच वकिलीच्या पदवीचे शिक्षणही मराठीतून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल नाशिक मध्ये दिली.Minister Chandrakant Patil मंत्री चंद्रकांत पाटहडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

महाकवी कालिदास कला मंदिरमध्ये दिमाखदार सोहळ्यात इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च २०२२ उपक्रमांतर्गत औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या गुणवंत इंजिनिअर्सचा पाटील यांच्या हस्ते विविध पारितोषिकांनी सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

नवीन शैक्षणिक धोरणात विविध विद्याशाखांचे शिक्षण हे मातृभाषेतूनच देण्याची तरतूद असून राज्यात ३१ डिसेंबर २०२२ नंतर नवीन वर्षात तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिकीची सर्व पाठ्यपुस्तकं मराठीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *