England in the semi-finals, hosts Australia out of the tournament.
इंग्लंड उपांत्य फेरीत, यजमान ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर.
आयसीसी टी-20 विश्वचषक: इंग्लंडने श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला
सिडनी: आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सिडनी येथे गट अ च्या अंतिम साखळी सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली आहे तर गतविजेता आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघ बाद झाला आहे.
अ गटातल्या अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेनं इंग्लंड पुढं विजयासाठी 142 धावांच आव्हान ठेवलं होत. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 141 धावा केल्या. 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 19.4 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने सर्वाधिक 47 धावा केल्या.
6 नोव्हेंबर 2022 रोजी भारताची लढत झिम्बाब्वेशी होणार आहे, तर दुसर्या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशशी लढेल.
काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं आयर्लंडला ३५ धावांनी हरवल्यानं उपांत्य फेरीत प्रवेश करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे. न्यूझीलंडनं दिलेल्या १८६ धावांच्या आव्हानाचा सामना करताना आयर्लंडचा डाव ९ बाद १५० धावसंख्येवर आटोपला. दुसऱ्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा चार धावांनी पराभव केला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com