टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत  इंग्लंडचा २० धावांनी न्यूझीलंड वर विजय

T20 Cricket World Cup टी ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

England won by 20 runs in the match of T20 World Cup

टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत  इंग्लंडचा २० धावांनी न्यूझीलंड वर विजय

उद्या अँडलेड येथे भारताचा सामना बांगलादेशशी

श्रीलंकेनं अफगाणिस्तानवर केली मात

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडला २० धावांनी पराभूत केलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघानं निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १७९ अशी आश्वासक धावसंख्या उभारली.T20 Cricket World Cup टी ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

अवघ्या ४७ चेंडूत ७३ धावांची तडाखेबंद खेळी करणाऱ्या जोस बटलरनं इंग्लंडच्या धावसंख्येला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

विजयासाठी १८० धावांचं आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेला न्यूझीलंडचा संघ निर्धारित २० षटकांत केवळ १५९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सनं ६२ तर केन विल्यम्सननं ४० धावांची खेळी करत न्यूझीलंड संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरल्याने अखेर न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला.

श्रीलंकेनं अफगाणिस्तानवर केली मात

अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघांदरम्यान झालेल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं अफगाणिस्तानवर मात केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघानं निर्धारित २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १४४ धावांपर्यंत मजल मारली.

अफगाणिस्तानचा एकही फलंदाज आज विशेष चमक दाखवू शकला नाही. विजयासाठी १४५ धावांचं आव्हान स्वीकारलेल्या श्रीलंका संघानं केवळ ४ गडी गमावत ही धावसंख्या १९ व्या षटकातच पार केली.

श्रीलंकेच्या धनंजय डिसिल्वानं अवघ्या ४२ चेंडूत ६६ धाव फटकावत श्रीलंकेच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.

उद्या अँडलेड येथे भारताचा सामना बांगलादेशशी

आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या अँडलेड येथे भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. दोन्ही संघाना उपांत्य सामन्यात प्रवेशा साठी या सामन्याची मोठी भूमिका असेल.

भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले असून, दोन जिंकले आहेत आणि एक पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेशनेही दोन जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत चांगल्या धावगतीमुळे बांगलादेशच्या वर आहे.

उद्या अँडलेडमध्ये पावसाची शक्यता हवामानशास्त्रज्ञाने वर्तवली असल्याने हवामान खराब होऊ शकते.

बांगलादेशवर विजय मिळविल्यास भारतीय संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश होईल, तर पावसामुळे सामना रद्द झाल्यास या गटातील दुसऱ्या संघासाठी उपांत्य फेरीत प्रवेशा साठी संधी मिळेल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *