Enjoy listening to the children’s literature award-winning book ‘Piuchi Wahi’..!!
बालसाहित्य पुरस्कारप्राप्त ‘पियूची वही’ पुस्तक ऐकण्याची नागरिकांना पर्वणी..!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘विद्यावाणी’चा बालदिनानिमित्त उपक्रम
पुणे, दि.७- पुस्तक हे ऐकलं जात नाही तर वाचलं जातं असं म्हणतात, पण डॉ.संगीता बर्वे लिखित साहित्य अकादमीचा ‘ बालसाहित्य ‘ पुरस्कारप्राप्त ‘पियूची वही’ हे पुस्तक प्रसारण ऐकण्याची पर्वणी नागरिकांना मिळणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बालदिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या विद्यावाणी या कम्युनिटी रेडिओ चॅनेल कडून याचे प्रसारण करण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे कम्युनिटी रेडिओ चॅनेल चालविला जात असून विद्यापीठ परिसरात १०७.४ एफ.एम. वर हे स्टेशन ऐकता येते. विद्यावाणीचे कार्यक्रम आपल्याला http://unipune.ac.in/vidyavani-pages/liveradio.htm या लिंकवर ऐकू शकता. किंवा vidyavani १०७.४ एफएम या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता.
डॉ.संगीता बर्वे यांनी याचे शीर्षक गीत लिहिले आहे. या पुस्तकाचा वाचन स्वर, संगीत व शीर्षकगीत गायन प्रांजली बर्वे करणार आहेत तर संगीत संयोजन अश्विनी महाजनी यांनी केले आहे. कार्यक्रमाची निर्मिती श्रीयोगी मांगले यांची आहे.
१४ नोव्हेंबर पासून पुढील १६ दिवस सकाळी ११ वाजता हे संपूर्ण पुस्तक ऐकता येणार आहे. या कार्यक्रमाचे पुनः प्रसारण १५ नोव्हेंबरपासून पुढील १६ दिवस दुपारी साडेतीन वाजता होईल, अशी माहिती विद्यावाणी ‘ चे संचालक डॉ.आनंद देशमुख यांनी दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com