पर्यावरण संवर्धनाबरोबर शाश्वत विकासासाठी इंधन बचत ही काळाची गरज

Ravindra Chavan Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection रवींद्र चव्हाण अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Fuel saving is the need of the hour for sustainable development along with environment conservation

पर्यावरण संवर्धनाबरोबर शाश्वत विकासासाठी इंधन बचत ही काळाची गरज

– मंत्री रवींद्र चव्हाण

इंधन बचतीसाठी सर्वच स्तरांवर जनजागृती होणं गरजेचं – अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री

‘सक्षम २०२२’ मध्ये देशात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकRavindra Chavan Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection
रवींद्र चव्हाण अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : देशाची ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी इंधन बचत ही काळाची गरज असून इंधन बचतीसाठी सर्वच स्तरांवर जनजागृती होणं गरजेचं असल्याचं मत अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं.

नैसर्गिक इंधनाची बचत आणि त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह इथं सक्षम अर्थात संरक्षण क्षमता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

‘सक्षम २०२२’ मध्ये राज्याने उत्तम कामगिरी केली असून इंधन बचत या उपक्रमांतर्गत सर्वाधिक कार्यक्रम करून राज्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावला असल्याचं त्यांनी सांगितलं.

तेल उद्योगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक संतोष निवेंदकर म्हणाले, की २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत ‘ऊर्जा संरक्षण नेट झीरोच्या दिशेने’ या टॅग लाईनसह संरक्षण क्षमता महोत्सव ‘सक्षम-२०२३’ चे आयोजन केले असून, सक्षम-२०२३ अंतर्गत राज्यात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) यांच्यामार्फत विविध १००० पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अतिरिक्त संचालक नंदन गजभिये यांनी आभार मानले.

राज्यभरात ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे या उपक्रमाच्या प्रचार आणि प्रसिध्दी साठी उपक्रम राबवावेत असं त्यांनी संगितलं. आजपासून ८ मे पर्यंत आयोजित ‘सक्षम-२०२३’ मध्ये पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्यामार्फत विविध १००० पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *