पुणे ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल वारीचे आयोजन

पुणे महानगरपालिकेतर्फे पुणे ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल वारीचे आयोजन Pune Municipal Corporation organizes Environmental Awareness Cycle Wari from Pune to Pandharpur हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Pune Municipal Corporation organizes Environmental Awareness Cycle Wari from Pune to Pandharpur

पुणे महानगरपालिके तर्फे पुणे ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल वारीचे आयोजन

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवार दिनांक १८ जून २०२२ रोजी मा. उपायुक्त माधव जगताप यांचे नेतृत्वाखाली पुणे ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

वारी मार्गावर ठिकठिकाणी बिजरोपण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना “स्वच्छ पुणे सुंदर पुणे” अशा संदेशासह सायकलचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.पुणे महानगरपालिकेतर्फे पुणे ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती सायकल वारीचे आयोजन  Pune Municipal Corporation organizes Environmental Awareness Cycle Wari from Pune to Pandharpur हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

सहभागी झालेले सेवक शनिवारी पहाटे निघून एक दिवसात २३० कि.मी. अंतर सायकलवर पार करून पंढरपूर येथे पोहोचणार आहेत व रविवारी पुन्हा २३० कि.मी. अंतर सायकलवर पार करून पुणे येथे परत येणार आहेत.

सदर उपक्रमात पुणे महानगरपालिकेतील श्री सुनील अहिरे, श्री उमाकांत डिग्गीकर, श्री विशाल पाटील, श्री संदीप आमले, श्री अभिमन्यू गाडे, श्री नितीन देडगे, श्री प्रशांत गवळी, श्री महेश कारंडे, श्री संतोष शिंदे, श्री राहुल सांगडे हे सेवक सहभागी होणार आहेत.

रॅलीचा औपचारिक शुभारंभ मा.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे हस्ते व मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) डॉ. कुणाल खेमनार यांचे उपस्थितीत शुक्रवार दिनांक १७ जुन २०२२ रोजी सायंकाळी ठिक ५.०० वा पुणे मनपा मुख्य इमारत येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रम प्रसंगी पुणे महानगरपालिकेतील सहभागी होणाऱ्या सेवकांना झेंडा दाखवून सदिच्छा देण्यात आल्या.

सदर कार्यक्रम प्रसंगी मा. उप आयुक्त माधव जगताप, महेश डोईफोडे, मा. मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण, मा. अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेश परदेशी यांनी केले.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *