Every Indian should be proud that India’s covid vaccination rate is higher than developed countries – Piyush Goyal
भारताचा कोविड लसीकरणाचा दर विकसित देशाच्या तुलनेत अधिक असल्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान असायला हवा – पियुष गोयल
मुंबई: भारताचा कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा दर विकसित देशाहून अधिक असून याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत प्रियम गांधी मोदी
File Photo
लिखित ‘अ नेशन टू प्रोटेक्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
या कार्यक्रमात, कोरोना काळात प्रधानमंत्र्यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमाबद्दल पियुष गोयल, महाराष्ट्राचे विधानसभा विराधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसंच पुस्तकाच्या लेखिका प्रियम गांधी मोदी यांनी चर्चा केली.
महामारीच्या काळात राबवण्यात आलेल्या गरजूना मोफत अन्न पुरवठा, आर्थिक मदत, आत्मनिर्भर भारत योजना, कोविड प्रतिबंधक लस निर्मिती, या मुद्दयांवर विशेष चर्चा झाली.