PM Modi distributes 71,000 appointment letters virtually to newly inducted recruits in govt departments
सरकारी नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना प्रधान मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वितरण
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं रोजगार मेळ्याच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं भरती झालेल्या सुमारे ७१ हजार उमेदवारांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्ती पत्र वितरित केली.
हा रोजगार मेळा या पुढे होणाऱ्या रोजगार निर्मितीला अधिक चालना देण्याकरता कामी येईल, आणि त्यासोबतच तरुणांना स्वतःला अधिक सक्षम करणासाठी तसेच देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी होता यावे यासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर नव्यानं नियुक्ती झालेल्या काही जणांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला.
आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध केल्याबद्दल नव्यानं भरती झालेल्यांनी केंद्रसरकार्सचं अभिनंदन केलं आणि आपली कौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्याची श्रेणी सुधारण्यासाठीच्या कर्मयोगी प्रारंभ मोड्यूलचं महत्व अधोरेखित केलं.
आज ज्यांना त्यांची नियुक्तीपत्रे मिळाली आहेत त्यांच्यासाठी ही एका नव्या प्रवासाची सुरुवात असेल यावर भर देत,पंतप्रधानांनी राष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात सरकारी यंत्रणेचा एक भाग बनून हे तरुण कशाप्रकारे उत्तम योगदान आणि भागीदारी देऊ शकतील, हे अधोरेखित केले.
त्यांनी नमूद केले, की अनेक नवनियुक्ती कर्मचारी सरकारचे थेट प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेशी संवाद साधतील आणि ते आपल्या पद्धतीने प्रभाव निर्माण करतील. ‘ग्राहक हा नेहमीच योग्य असतो’, या व्यापार-उद्योगजगतातील म्हणीशी साधर्म्य दाखवत पंतप्रधानांनी सूचना केली,की आपणही ‘नागरिक नेहमीच बरोबर असतो’ हा मंत्र प्रशासनात राबवायला हवा.’ “यामुळे सेवाभावी भावना वाढीस लागते आणि ती बळकटही होते”, असे सांगत पंतप्रधानांनी नमूद केले की जेव्हा एखादी व्यक्ती सरकारी पदावर नियुक्त होते तेव्हा त्याला सरकारी सेवा म्हणून संबोधले जाते,नोकरी नव्हे.140 कोटी भारतीय नागरिकांची सेवा करता येण्याचा अनुभव घेताना मिळणारा आनंदही त्यांनी अधोरेखित केला आणि त्याचा लोकांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे सांगितले.
प्रधानमंत्र्यांनी यापूर्वी गेल्या वर्षीच्या नोव्हेम्बर महिन्यात नव्यानं नियुक्त झालेल्या ७१ हजार जणांना, तर ऑक्टोबर महिन्यात ७५ हजार जणांना नियुक्तीपत्र वितरित केली होती.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकार देशातल्या युवा वर्गासाठी रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचं गृह राज्यमंत्री अजय कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित रोजगार मेळ्यात बोलत होते.
देशात १० लाख रोजगार उपलब्ध करण्याच्या प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रसरकारने अनेक कार्यक्रम आणि उपक्रम सुरु केल्याचं ते यावेळी म्हणाले.
वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज मुंबईत वांद्रे इथं आयोजित रोजगार मेळ्यात विविध पदांवर भरती झालेल्या २५ तरुणांना नियुक्ती पत्र वितरित केली. रंगशारदा इथं आयोजित रोजगार मेळ्याच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण ११७ उमेदवारांना नियुक्ती पत्र वितरित केली जाणार असून, केंद्रसरकारच्या विविध १० विभागांमध्ये त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com