Ex-Serviceman Opportunity to pursue Arts Degree from Andhra University
माजी सैनिकांना आंध्र विद्यापीठातून कला पदवी मिळविण्याची संधी
पुणे : माजी सैनिकांना कला शाखेतून बीए (एचआरएम) पदवीचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला आहे. हे पदवीचे प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त असणार असून इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माजी सैनिकांना नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनविणे हा यामागील उद्देश आहे. माजी सैनिकांसाठी कला शाखेतून पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्रता व अटी पुढील प्रमाणे आहेत. अर्जदार माजी सैनिक असावा. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता बारावी किंवा समतुल्य शिक्षण किंवा भारतीय भुदल, नौदल, हवाईदलव्दारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र. माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी. १ जानेवरी २०१० नंतर सेवानिवृत्त झालेला असावा.
माजी सैनिक इयत्ता दहावी उत्तीर्ण असल्यास त्याला ५ वर्षाचा अभ्यासक्रम (२ वर्ष १२ वी + ३ वर्ष पदवी) लागू राहील. सदर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क १२ हजार ५०० रुपये आहे. अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहीतीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल (नि) एस. डी. हंगे यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com