Common people will not have any problem exchanging 2000 notes
२ हजारच्या नोटा बदलून घ्यायला सर्वसामान्यांना त्रास होणार नाही
२ हजारच्या नोटा बदलून घ्यायला ६ महिन्यांचा कालावधी असल्यानं सर्वसामान्यांना त्रास होणार नाही – भागवत कराड
मुंबई : क्लीन नोट धोरणांतर्गत रिझर्व्ह बँकेनं २००० रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता लोक २००० च्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेतून इतर नोटांच्या बदल्यात परत करु शकतात. मात्र सध्या २०००च्या नोटांची वैधता कायम राहणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, बॅंकांच्या १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध राहणार असून २३ मे ते ३० सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकावेळी वीस हजारांपर्यंत नोटा बॅंकेत जमा करता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मते, २००० रुपयांच्या नोटांपैकी ८९ टक्के नोटा मार्च २०१७ पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या आणि त्यांचं अंदाजे पाच वर्षांचं आयुष्य पूर्ण झालं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भागवत कराड म्हणाले की, आता हातगाडीवाल्यापासून उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला डिजीटल व्यवहार माहिती झाले आहेत. त्यामुळे बँकेतील व्यवहार डिजीटल माध्यमातून होत आहे.
आर बी आय ही शिखर बॅंक असुन ती स्वायत्त संस्था असल्यानं तिला नोटाबंदीचा अधिकार आहे आणि म्हणूनच बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. लोकांना नोटा बॅंकेत जमा करायला सहा महिन्यांचा कालावधी दिला असल्यानं सर्वसामान्यांना त्रास होणार नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी दिली.
नोटबंदी हा सर्वस्वी रिझर्व बँकेचा अधिकार असून त्यावर काही बोलणं उचित होणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com