आम्ही असं विद्यापीठ कधी पहिलंच नव्हतं.!

We have never had such a university before! We have never had such a university before!

आम्ही असं विद्यापीठ कधी पहिलंच नव्हतं.!

हेरिटेज वॉकला उस्फुर्त प्रतिसाद

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या
Savitribai Phule Pune University .

पुणे : ” आम्ही इतके वर्ष सकाळी फिरायला येतोय पण असं विद्यापीठ कधी पाहिलं नव्हतं.!” ” आम्ही अनेक वर्ष इथे काम करतोय पण हे भुयार माहितच नव्हतं अशा उस्फुर्त प्रतिक्रियांनी ९ एप्रिल रोजीचा हेरिटेज वॉक पार पडला. याला जवळपास दीडशे नागरिकांनी हजेरी लावली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१८ पासून विद्यापीठाचा इतिहास सांगणारा वारसा दर्शन कार्यक्रम म्हणजेच हेरिटेज वॉक ला सुरुवात केली आहे. मधल्या काही काळात कोविडमुळे यात खंड पडला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हा वॉक सुरू करण्यात आला होता.

विद्यापीठ म्हणजे केवळ भिंती नसून इथल्या माणसांनी केलेलं काम आहे. विद्यापीठ इमारत व इथला आपण जतन केलेला वारसा सर्व नागरिकांना पाहायला मिळावा म्हणून हा हेरिटेज वॉक आपण आयोजित करत आहोत. याचा सर्व नागरिकांनी जरूर लाभ घ्यावा.
-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरूसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

साधारणपणे सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा हेरिटेज वॉक आयोजित करण्यात येतो. हा निःशुल्क असून सर्व नागरिकांसाठी खुला असतो.

या वॉकमध्ये नागरिकांना विद्यापीठाची १५० वर्ष जुनी मुख्य इमारत, भुयारी मार्ग, मुख्य इमारतीत असणारे ऐतिहासिक संग्रहालय, नव्याने उभारण्यात आलेले व्यंगचित्रकला संग्रहालय, विद्यापीठात असणारी दुर्मिळ चित्र पाहण्याबरोबरच विद्यापीठ परिसर पाहण्याची संधी मिळते.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *