Exemption from customs duty on medicines and food items for rare diseases
दुर्मिळ आजारांवरील औषधं आणि अन्नपदार्थांना सीमाशुल्कातून सूट देण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
र्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्या पेम्ब्रोलिझुमॅब या औषधाला मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट
नवी दिल्ली : देशात दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या सर्व औषधं आणि विशेष खाद्यपदार्थांना सीमा शुल्कातून सुट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सूट मिळालेली ही औषधं आणि खाद्य पदार्थ दुर्मिळ आजारांसाठी राष्ट्रीय धोरण २०२१ अंतर्गत सूचीबद्ध आहेत.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, वैयक्तिक आयातदाराला, केंद्रीय किंवा राज्य आरोग्य संचालक, किंवा जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकांचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल, असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. सरकारने कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्या पेम्ब्रोलिझुमॅब या औषधाला मूलभूत सीमा शुल्कातून पूर्णपणे सूट दिली आहे.
पाठीच्या कण्यासंबंधित स्नायू विकार, स्पायनल मस्कुलर ऍट्रोफी किंवा स्नायू विकार, ड्यूशेन मस्कुलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी निर्देशित औषधांना आधीच सूट प्रदान केली आहे. अशात, इतर दुर्धर रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांसाठी सीमाशुल्कात सवलत मिळावी यासाठी सरकारला अनेक निवेदने प्राप्त होत आहेत. या रोगांवरील औषधे किंवा विशेष अन्न, उपचार महाग असून ते आयात करणे आवश्यक आहे.
काही दुर्धर आजारांमधे 10 किलो वजनाच्या बालकासाठी उपचारांचा वार्षिक खर्च 10 लाख ते 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो असा अंदाज आहे. औषधांची मात्रा आणि खर्च, वय तसेच वजनानुसार आजीवन वाढताच असतो.
या सवलतीमुळे रुग्णांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि त्यांना दिलासा मिळेल.
औषधांवर साधारणपणे दहा टक्के मूलभूत सीमा शुल्क आकारले जाते, तर काही जीवनरक्षक औषधे आणि लसींवर पाच टक्के किंवा शून्य सवलतीचा दर लागू होतो. मंत्रालयाने सांगितले की, दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधे आणि औषधांसाठी सीमाशुल्क सवलत मिळावी यासाठी सरकारला अनेक निवेदने प्राप्त होत आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com