सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षारंभानिमित्त प्रदर्शन

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Exhibition on 24th September in University Main Building on the occasion of centenary golden jubilee year of Satya Shodhak Samaj

सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षारंभानिमित्त २४ सप्टेंबर रोजी विद्यापीठ मुख्य इमारतीत प्रदर्शन

पुणे : महात्मा फुले यांनी पुण्यात २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. २४ सप्टेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाजाला १४९ वर्षं पूर्ण होऊन तो दीडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक घटनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून इतिहास विभागातर्फे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील संग्रहालयात सत्यशोधक साहित्याचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या
Savitribai Phule Pune University .

लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतून मिळवलेल्या सत्यशोधक साहित्यासह विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, फर्ग्युसन कॉलेजचे वाडिया ग्रंथालय, शाहू वाचनालय काकडवाडी, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मृती ग्रंथालय, कुकाणे, तसेच खर्डेकर ग्रंथालय, शिवाजी विद्यापीठ अशा विविध ग्रंथालयांमधून आणलेल्या सत्यशोधक साहित्याच्या प्रती जनतेला पाहण्यासाठी यावेळी उपलब्ध असतील.

सत्यशोधक विचारांची पुस्तके, वृत्तपत्रे आणि कार्यकर्त्यांची माहिती या प्रदर्शनात मांडली जाईल असे इतिहास विभागाच्या प्रमुख. प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी सांगितले. डॉ. कुंभोजकर यांच्या संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून जमा केलेल्या या साहित्याच्या अभ्यासासाठी त्यांना भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचं अनुदान मिळालं आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ब्रिटिशकालीन मुख्य इमारतीत पहिल्या मजल्यावरील इतिहासविषयक संग्रहालयामध्ये येथे दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मा. कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत केलं जाईल.

दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात हे प्रदर्शन सुरू राहील. तसंच नेहमीप्रमाणे २४ सप्टेंबर या चौथ्या शनिवारी विद्यापीठ मुख्य इमारतीची वारसा सहल सकाळी ११ वाजता आयोजित केली जाईल. तरी नागरिकांनी सत्यशोधक साहित्याचे प्रदर्शन पाहण्याच्या संधीचा लाभ घ्यावा.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *