Expedited visa assurance to Indian students admitted to universities and educational institutions in Australia
ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना जलद व्हिसा देण्याचे आश्वासन
नवी दिल्ली: भारतीय विद्यार्थ्यांना जलद गतीने व्हिसा देण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आश्वासनाचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केले, भारतीय मनुष्यबळाला जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्याचे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ऑस्ट्रेलियाचे शिक्षणमंत्री जेसन क्लेअर यांची भेट घेतली.
ऑस्ट्रेलियातील नवीन मजूर पक्षाच्या सरकारमध्ये जेसन क्लेअर यांनी मंत्रीपद स्वीकारल्याबद्दल प्रधान यांनी त्यांचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना जलद व्हिसा देण्याचे आश्वासन क्लेअर यांनी यावेळी दिले. ऑस्ट्रेलियाच्या या भूमिकेचे प्रधान यांनी मनापासून स्वागत केले.
कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण या क्षेत्रांतील सहकार्यासह ऑस्ट्रेलियाची ख्याती असलेल्या जागतिक दर्जाच्या कौशल्य शिक्षणाचा लाभ भारतीय मनुष्यबळाला मिळावा यादृष्टीने सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात प्रधान यांनी या बैठकीत चर्चा केली.
प्रधान यांनी जेसन क्लेअर यांना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 बद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे विविध पद्धतींद्वारे शिक्षणातील आंतरराष्ट्रीयीकरणासाठी व्यापक संधी, तसेच गिफ्ट सिटीमधील संस्थांसाठी तयार केलेले अनुकूल वातावरण यावर देखील माहिती दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com