Extension of Nanded-Hadapsar Superfast Railway to Pune
नांदेड-हडपसर सुपरफास्ट रेल्वेचा पुण्यापर्यंत विस्तार
परभणी : मराठवाड्यातून पुण्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी खुशखबर दिली आहे. मनमाडमार्गे आठवड्यातून दोनदा धावणार्या नांदेड-हडपसर सुपरफास्ट रेल्वेचा (Nanded-Hadapsar Superfast Train) विस्तार पुण्यापर्यंत करून ती आधुनिक एलएचबी कोचसह नियमित धावणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या पदाधिकार्यांना दिली.
परभणी इथं काल प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळानं दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि रेल्वे प्रश्नांबाबत निवेदन सादर केलं, त्यावेळी ते बोलत होते.
पुढच्या महिन्यात जालना स्थानकावर पीट लाईनचं उद्घाटन करणार असल्याचं सांगतानाच औरंगाबाद इथंही एक पीट लाईन होणार असल्याची ग्वाही दानवे त्यांनी दिली. पंढरपूर रेल्वे परत येताना लातूर रोड स्थानकावर दररोज तीन-तीन तासापर्यंत उभे करण्यात येत असल्याचे दानवे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तेव्हा त्यांनी संबंधित रेल्वे अधिकार्यांना फोन लावून कोणत्याही रेल्वे स्थानकावर पंढरपूर रेल्वेला बिनकामी उभे करू नये असे ठणकावून सांगितले. तसेच विभागातील सर्व रेल्वे गाड्यांचा लूज टाईम रद्द करण्यासोबत मुंबई-नांदेड राज्य-राणी एक्सप्रेसला अतिरिक्त स्लीपर लावण्यासाठी अधिकार्यांना आदेश दिले.
मनमाड ते औरंगाबादपर्यंत दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली असून, पुढील टप्प्यात औरंगाबाद ते परभणी दरम्यानच्या दुहेरीकरणाचं काम देखील पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी यावेळी दिली.
हडपसर न्युज ब्युरो