मुक्त व दूरस्थच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशास मुदतवाढ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Extension of time for open and distance degree and postgraduate admissions

मुक्त व दूरस्थच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशास मुदतवाढ

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बीए, बी.कॉम, एम.ए, एम.कॉम या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी याआधी ३० ऑक्टोबर २०२२ ही मुदत देण्यात आली होती.   Savitribai Phule Pune University

आता ही प्रवेश घेण्याची मुदत वाढविण्यात आली असून दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ सकाळी ११ वाजेपर्यंत विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या प्रवेशाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर http://unipune.ac.in/SOL देण्यात आली आहे.

ज्यांना नोकरी करत शिकण्याची इच्छा आहे अशा नोकरदारांना या माध्यमातून पदवी घेता येते. तसेच सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना नियमित वर्गात येणे शक्य नाही अशांना यामुळे शिक्षण घेणे सोपे होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *