ख्यातनाम मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Famous Marathi actor Pradeep Patwardhan passed away ख्यातनाम मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Famous Marathi actor Pradeep Patwardhan passed away

ख्यातनाम मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मुंबई : ख्यातनाम मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज सकाळी मुंबईत हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६४ वर्षांचे होत. प्रदीप पटवर्धन यांनी अनेक लोकप्रिय मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अभिनय केला होता.Famous Marathi actor Pradeep Patwardhan passed away ख्यातनाम मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाची दु:खद बातमी मंगळवारी समोर आल्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या आजाराने निधन झाल्यामुळे या अभिनेत्याने मुंबईतील गिरगावातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

1 जानेवारी 1970 रोजी जन्मलेल्या प्रदीप पटवर्धन यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलाकार म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. मराठी नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करून या अभिनेत्याने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. प्रदीप पटवर्धन हे मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलाकार म्हणून ओळखले जात होते.

90 च्या दशकांत मराठी नाटकांतून प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या प्रदीप यांची नाट्यकीर्द मोठी होती. प्रदीप यांची ओळख झाली ती मोरुची मावशीतूनच. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले. त्यांची ती ओळख कायम राहिली. प्रदीप पटवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याचं स्पर्धा गाजवल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका यांमधून प्रदीप हे प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.

मोरूची मावशी हे त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक होतं. नवरा माझा नवसाचा, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं यासारख्या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका देखील गाजल्या. प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधल्या आपल्या अभिनयानं रसिकांचं मन जिंकलं होतं.

प्रदीप पटवर्धन एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोळा बेरीज (2012), पोलीस लाइन (2016) आणि 1234 (2016) मधील त्यांच्या कामासाठी ओळखले जात होते. त्याने अनुराग कश्यपच्या 2015 मध्ये आलेल्या बॉम्बे वेल्वेट चित्रपटातही काम केले होते. मात्र, तो गेल्या काही काळापासून पडद्यापासून दूर होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदीप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मराठीत लिहिले की, “मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाने एक महान कलाकार गमावला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांची अकाली ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी आहे. रंगभूमीवरचा हसरा आणि सदाबहार चेहरा यापुढे दिसणार नाही, याचे अतिशय वाईट वाटते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

जेव्हा फक्त दूरदर्शनचा जमाना होता, त्या मनोरंजनाच्या प्रारंभीच्या काळात अनेक मालिकांच्या माध्यमांतून घराघरात ते पोहोचले आणि नंतर अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपली स्वत:ची अमिट अशी छाप उमटवली. ‘मोरुची मावशी’ या नाटकाचे स्मरण होताना प्रत्येक वेळी प्रदीप पटवर्धन यांची आठवण होईल. अनेक चित्रपट सुद्धा त्यांनी गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट आणि चाहते यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *