चाळीस वर्षे विद्यापीठाचा होतो, पुढेही राहील..!

Farewell to Dr  Nitin Karmalkar, Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University

चाळीस वर्षे विद्यापीठाचा होतो, पुढेही राहील..!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकरांना सहृदय निरोप

पुणे : विद्यार्थीदशेत असताना मी विद्यापीठात आलो. छोट्याशा गावातून विद्यापीठात आल्यावर परदेशात आलोय असं वाटलं होतं. इथेच शिकलो, इथेच डॉक्टरेट मिळवली, इथेच प्राध्यापक झालो, इथेच विभागप्रमुख झालो आणि इथेच कुलगुरू देखील झालो. विद्यापीठाने दीडशे वर्षात आपल्याला खूप काही दिलं, त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न मी माझ्या या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात केला, असे म्हणत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.Farewell to Dr  Nitin Karmalkar, Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ.नितीन करमळकरांना सहृदय निरोप हडपसर मराठी बातम्या  Hadapsar News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाते यांच्या सेवकाळ समाप्तीनिमित्त आयोजित सेवागौरव समारंभदरम्यान ते बोलत होते.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या डॉ. अंजली कुरणे, आंतररविद्याशाखीय अभ्यासाचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे आदींचा या पदांचा सेवा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याही सेवा गौरव समारंभाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परसिस्टंट सिस्टीम कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आनंद देशपांडे उपस्थित होते. तर डॉ.शां.ब. मुजुमदार, डॉ.के.एच. संचेती, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अधिसभा सदस्य सुनेत्रा पवार, कुलगुरुंच्या पत्नी रोहिणी करमळकर, प्र-कुलगुरूंच्या पत्नी महानंदा उमराणी यांच्यासह व्यवस्थपन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

अनेक लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी कौशल्य असणारे, नेतृत्व असणारे वाघासारखे व्यक्तिमत्त्व लागते जे डॉ. करमळकरांचे आहे. डॉ. करमळकरांसोबत भविष्यातही आम्ही एकत्र काम करू.
– आनंद देशपांडे, संस्थापक अध्यक्ष, परसिस्टंट सिस्टिम कंपनी

यावेळी डॉ.करमळकर म्हणाले, निर्णय घेताना तो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताचा, गुणवत्तेला प्राध्यान्य देणारा असावा असा माझा आग्रह होता. डिग्री प्लसच्या माध्यमातून अद्ययावत ज्ञान, सामंजस्य कराराच्या माध्यमातून समाज्याशी नाळ जोडणं, मोठी आणि चांगली माणसं विद्यापीठाच्या परिसंस्थेशी कायमस्वरूपी जोडणं, उद्योग आणि शिक्षण याची सांगड घालणे, प्रशाला पद्धती आणणे आदी कामे मी प्राधान्याने पूर्ण केली ज्यातून सर्वांगीण दृष्टीने विद्यार्थी घडेल हा विचार त्यात होता.

डॉ. उमराणी म्हणाले, उच्च शिक्षणात केवळ गुणांच्या आधारे नाही तर विश्लेषण, चिकित्सा यावर भर द्यायला हवा. डॉ. करमळकर यांनी मला काम करताना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि अतिशय विश्वासाने माझ्यावर जबाबदाऱ्या दिल्या ज्यात कधीच त्यांनी हस्तक्षेप केला नाही.

कुलगुरूंची निवड निरपेक्ष व्हावी- डॉ.शां.ब.मुजुमदार

सध्या कुलगुरू निवडीबाबत जे सुरू आहे ते अतिशय क्लेशदायक आहे. समाजातील चांगल्या व्यक्तींनी एकत्र येत हा निवडीबाबतचा बदल घडवावा, असे प्रतिपादन सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब.मुजुमदार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजेश पांडे यांनी डॉ. करमळकर यांच्यासोबतचा प्रवास सांगितला. तर डॉ. पवार यांनी डॉ.करमळकर यांची कामाची पद्धत व स्वभाववैशिष्ट्ये विशद केली. सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले तर आभार डॉ. अपूर्वा पालकर यांनी मानले.

या कार्यक्रमाला माजी कुलगुरू, प्रथितयश प्राध्यापक, नामांकित व्यक्ती यांसह अनेक मंडळी डॉ. करमळकर यांना निरोप व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *