Farmers should come forward not as food providers but as energy providers – Nitin Gadkari
शेतकऱ्यांनी आता अन्नदाता म्हणूनच न राहता उर्जादाता म्हणून पुढं यावं – नितीन गडकरी
नागपुर : शेतकऱ्यांनी आता अन्नदाता म्हणूनच न राहता उर्जादाता म्हणून पुढं यावं आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते नागपुरात इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटस् ऑफ इंडिया आणि वनामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात बोलत होते.
देशाची पेट्रोल-डिझेलची गरज कमी व्हावी, आणि या आयातीचा खर्च कृषिविषयक उपक्रमासाठी खर्च व्हावा, यासाठी आता शेतकरी आणि शेती व्यवस्थापन संस्थानी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देशाची कृषी आर्थिक व्यवस्था ही शाश्वत बनवणं गरजेचं आहे. देशाचा कृषिदर २५ टक्क्यावर गेला तरच देशाचा संतुलित आर्थिक समतोल राखता येईल. विविध राज्यात येणाऱ्या पुरांचं योग्य नियंत्रण, नद्यांच्या खोऱ्यांचं नियोजन केलं तर शेतीला पाण्याची समस्या जाणवणार नाही, असं गडकरी म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com